Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील तीन बिर्याणी हाऊससह जिल्ह्यातील ३८ बिर्याणी हाऊसवर पोलिसांचा छापा…..!

केज तालुक्यातील तीन बिर्याणी हाऊससह जिल्ह्यातील ३८ बिर्याणी हाऊसवर पोलिसांचा छापा…..!

Chicken dhum biriyani using jeera rice and spices arranged in earthen ware with raitha and lemon pickle on grey background.

बीड दि.५ – मागच्या अनेक वर्षांपासून बिर्याणी हाऊसमध्ये सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीकडे अखेर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी लक्ष केंद्रित करून जिल्हयातील ३८ बिर्याणी चालकांवर गुन्हा दाखल केले आहेत.बीडच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल.
          अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून कारवाईचा दणका सुरूच ठेवला आहे.कधी वाळू तस्करी,कधी गुटख्या माफिया,कधी दारूवाले,तर कधी वाहनांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याची जरब बसावी म्हणून बारगळ सातत्याने कारवाया करत आहेत.शुक्रवारी दिवसभर बिर्याणी सेंटरमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील ३८ ठिकाणी छापे मारण्यात आले.यात ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.दरम्यान पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके,सहा. पोलीस अधिक्षक धीरजकुमार बच्चू,सहा. पोलीस अधिक्षक कमलेश मीना,उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे, उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू,उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,शिवाजी बंटेवाड,मारुती खेडकर, एस.एम.जाधव, मजहर सय्यद, बालक कोळी,प्रशांत महाजन,विनोद घोळवे,रामराव पडवळ,संभाजी ढोणे, सपोनि मधुसूदन घुगे,सोमनाथ नरके,मंगेश साळवे,भार्गव सपकाळ,अमन सिरसाट,अनिल खोडेवाड, भाऊसाहेब वाघमोडे,मछिंद्र शेंडगे,अनमोल केदार,राजकुमार ससाणे यांच्या वतीने करण्यात आली.
          दरम्यान, राजेंद्र सूर्यवंशी (वय-४४ पिसेगाव ता.केज),अशोक राऊत (वय-२४ रा.बलुत्याचा मळा,अंबाजोगाई),सचिन मुद्गुलवार (वय-२३ कोठडगल्ली ता.अंबाजोगाई)  लहू विठ्ठल मिसाळ रा. घाटनांदूर ता. अंबाजोगाई,कृष्णा वैजनाथ घायतडक रा. शिमरी पारगाव ता. माजलगाव,सुभाष मसुराम जाधव रा.साळींबा,सतीश दिलीपराव शिंदे रा.दादाहरी वडगाव ता.परळी,चंद्रकांत राजेभाऊ जावळे (वय -३४ रा.देवळा ता वडवणी,किसन ज्ञानोबा मायकर रा. आडस ता. केज, परमेश्वर बाबुराव पौळ रा. तेलगाव ता. धारूर,गणेश बाळासाहेब मोरे (वय ३१ रा. बर्दापूर ता अंबाजोगाई ),शिवाजी गंगाराम रोडे (वय ५५ रा. कन्हेरवाडी ता परळी),तानाजी सोपान मस्के (वय ४८ रा. साठेनगर परळी,वसंत आजिनाथ पवार (वय ३२ रा पालवन),किसान बाजीराव मुळे (वय ४८ रा. पिपळनेर, अनिल राजेभाऊ बेदरे (वय ३५ रा.अंतरवली ता. गेवराई ),संतोष आप्पा फुलमाळी रा. कडा ता.आष्टी,राम तुकाराम धनवडे रा.पाली,अक्षय मिठू चव्हाण ता.आष्टी ,संतोष निकर जाधव रा. आगेवाडी ता. आष्टी ,उत्तमराव जाधव (वय ५६ रा सुतार गल्ली पाटोदा ता. पाटोदा),अमोल भीमराव हुले वय २६ रा. धालेवाडी ता पाटोदा ,बापू नारायण चौरे रा. तळेपिंपळगाव. ता.पाटोदा,सतीश संदीपान नांदे (वय ३२ रा. लींबारुई देवी ता. बीड),रामचंद्र सदाशिव मुंडे रा. तळेगाव ता. परळी ,रामदास धर्मराज गोचडे (वय ३५ रा जनई ता अंबाजोगाई),महादेव साहेबराव केन्द्रे वय ४७ रा. केंद्रेवाडी ता. अंबाजोगाई ,कृष्णा बाळासाहेब गायकवाड (वय २४रा.मस्साजोग ता.केज),प्रल्हाद रामराव राठोड (वय ४४ ता. वारोळा ता माजलगाव),संतोष कानिराम पवार (वय २८रा वारोळा.ता माजलगाव),अजिनाथ बाळासाहेब वारे (वय ४८ रा.पांगरी ता. शिरूर कासार),बाळासाहेब अंकुश पवार (वय ४५रा.अंमळनेर रा. पाटोदा),नवनाथ सुदामराव ढोले (वय ४२ रा. अशोक नगर बशीनाका बीड),सिद्धेश्वर विष्णुपंत मोकाशी (वय ३३रा. संत नामदेवनगर बीड),प्रदीप ज्ञानेश्वर मस्के (वय २४ रा पालवन ता. बीड)
शेअर करा
Exit mobile version