Site icon सक्रिय न्यूज

काँग्रेसच्या बीड जिल्हा मिडिया सेल प्रमुख पदी संतोष सोनवणे…!

काँग्रेसच्या बीड जिल्हा मिडिया सेल प्रमुख पदी संतोष सोनवणे…!

केज दि.९ – तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील रहिवासी तथा मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे संतोष भारतराव सोनवणे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया सेलच्या बीड जिल्हा प्रमुख पदी निवड झाली आहे.

            संतोष भारतराव सोनवणे हे मागच्या अनेक वर्षांपासून बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. अनेक वर्ष त्यांनी पत्रकारितेमध्येही मोठ्या प्रमाणावर लिखाण करून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. एक रोखठोक पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. आणि या सर्व कामांची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या बीड जिल्हा मीडिया सेल प्रमुख पदी संतोष सोनवणे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे
               त्यांच्या या निवडीबद्दल खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आदित्य पाटील,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह आणि सन्माननीय मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version