बीड दि.२२ – स्थानिक गुन्हे शाखा बीड ने प्रतिबंधीत पान मसाला गुटका बाळगणाऱ्या विरुध्द दोन ठिकाणी छापेमारी करुन 191260/- गुटख्याचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत.
अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, बीड यांनी अवैध गुटख्या विरुध्द कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक उस्मान शेख, स्था.गु.शा.बीड यांना आदेश दिले आहे. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अधिकारी व अंमलदार यांना प्रतिबंधीत पानमसाला गुटक्या बाळणारे इसमाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिनांक 22/10/2024 रोजी पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे यांचे पथकाने शिवाजीनगर,बीड हद्दीतील शिंदेनगर कॅनॉल रोड येथे प्रितम निवृत्ती मोहळकर, रा.शिंदे नगर यांचे हा प्रतिबंधीत गुटख्याचा मुद्देमाल एकुण 57500/- रु चा मुद्देमाल हस्तगत करुन पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे पोह/मनोज वाघ यांचे फिर्याद वरुन गुन्हा नोंद केला आहे.
तसेच पोउपनि हनुमान खेडकर यांचे पथकाने बीड शहरातील हत्तीखाना येथील फशी किराणा दुकानात अवैधरित्या गुटखा बाळगुन ठेवण्याची माहिती मिळताच स्थागुशा पथकाने सदर किरणा दुकानावर छापा टाकुन प्रतिबंधीत पानमसाला गुटख्याचा 1,33760/- रु चा मुद्देमाल साठा करुन ठेवलेला मिळुन आला असुन आरोपी मोमीन फासीयोद्दीन मोमीन फाजलोद्दीन रा. हत्तीखाना बीड यांचे विरुध्द पो.स्टे.बीड शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा,बीड ने दोन ठिकाणी अवैध गुटखा बाळगणारे आरोपी विरुध्द छापेमारी करुन कारवाई केलेली असुन एकुण 191260/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक,बीड, पोलीस निरिक्षक उस्मान शेख, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे, श्रेणी पोउपनि खेडकर, सफौ/तुळशिराम जगताप, पोह/568 ठोंबरे, मनोज वाघ, पोह/देविदास जमदाडे, राहुल शिंदे, विकास वाघमारे, राजु पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, बप्पासाहेब घोडके, चालक गणेश मराडे, सुनिल राठोड यांनी केली आहे.