बीड दि.२७ – जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राशप मध्ये प्रवेश करून जिल्हा काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मागच्या अनेक वर्षांपासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे राहुल सोनवणे यांची बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांच्या मान्यतेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार राहुल सोनवणे यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवडीचे पत्र देण्यात आले राहुल सोनवणे हे खासदार रजनीताई पाटील तसेच माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेसने त्यांची वर्णी जिल्हाध्यक्षपदी लावल्याने बीड जिल्ह्यात त्यांच्यावर अभिनंदन आता वर्षाव होत आहे.