Site icon सक्रिय न्यूज

क्रीडा संकुलाच्या सुविधेमुळे अनेक खेळाडू पुढे येतील – आ. मुंदडा…..!

क्रीडा संकुलाच्या सुविधेमुळे अनेक खेळाडू पुढे येतील – आ. मुंदडा…..!

Oplus_131072

केज दि.१ – कुठल्याही मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मूलभूत गरजांची तेवढीच पूर्तता झाली पाहिजे आणि इतरही कांही प्रकल्प कार्यान्वित झाल्या पाहिजेत. आणि असाच संकल्प डोक्यात ठेवून आमदार नमिता मुंदडा यांनी मागच्या आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक योजना केज मतदारसंघासाठी खेचून आणल्या आहेत.

    केज विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता यामध्ये केज आंबेजोगाई हे दोन तालुके आणि नेकनूर परिसरातील बहुतांश भाग हा केज विधानसभा मतदारसंघांमध्ये येतो. या तीन मोठ्या शहरांमध्ये मूलभूत सुविधांबरोबरच तरुण असतील, महिला असतील किंवा वृद्ध असतील यांच्यासाठी काही योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत अशा संकल्पनेतून आमदार नमिता मुंदडा यांनी केज शहरातील खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळावं या उद्देशाने सातत्याने पाठपुरावा करून क्रीडा संकुल मंजूर करून घेतले. केज पासून जवळच असलेल्या पिसेगाव परिसरामध्ये सुमारे 12 एक्कर मध्ये हे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे, आणि मागच्याच काही दिवसांपूर्वी क्रीडा संकुलाचे भूमिपूजनही झाले. या क्रीडा संकुलामध्ये वेगवेगळ्या खेळांच्या सुविधा, भव्य मैदान आणि वेगवेगळ्या खेळांचे अत्याधुनिक साहित्यही उपलब्ध होणार आहे. बारा एकर मध्ये उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलासाठी चार कोटींचा निधीही मंजूर झालेला असून लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार नमिता मुंदडा यांनी दिली.
              दरम्यान शहरात खेळाचे मैदान नाही, बगीचा नाही त्यामुळे मुलं असतील किंवा वृद्ध असतील  त्यांना खेळण्यासाठी, विरंगुळ्यासाठी कुठलेच हक्काचे ठिकाण असल्याने केज शहरातून उत्कृष्ट क्रीडापटू कसे पुढे येतील ? या विचारातून क्रीडा संकुलाचा संकल्प मनामध्ये केला आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून केज शहरासाठी क्रीडा संकुल मंजूर करून घेतल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली. त्यामुळे नमिता मुंदडा यांच्या प्रचारा दरम्यान हा महत्वाचा मुद्दा समोर येत आहे.
शेअर करा
Exit mobile version