केज दि.४ – मराठा आरक्षण आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मागच्या काही दिवसांपासून निवडणूक लढवायची की नाही या विषयावर अखेर पडदा पाडला असून मनोज जरांगे यांनी कुठल्याही एका जातीवर निवडून येणं शक्य नाही त्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व उमेदवारांना ज्यांनी अर्ज दाखल केले होते त्यांना निवडणुकीचे अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेतली. सर्वांना उत्सुकता होती की कुठल्या कुठल्या मतदारसंघातून कुणाकुणाला ते पाठिंबा देणार ? मात्र कुठल्याही एकाच जातीवर निवडून येणे शक्य नाही आणि मित्र पक्षांची यादी अद्याप पर्यंत प्राप्त झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघात माजी आमदार संगिता ठोंबरे, नगराध्यक्ष सीता बनसोड जरांगे पाटलांच्या पाठिंब्याच्या प्रतीक्षेत होते ते आता काय भूमिका घेणार हे आजच तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल. मात्र या भूमिकेचा फायदा नेमका कुणाला होतो याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.