केज दि.४ – माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी सर्व ताकतीनिशी आणि मनाचा निश्चय करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अचानक पणे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा आणि आपल्या विचाराचा उमेदवार निवडून यावा या दृष्टिकोनातून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे स्पष्ट मत माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी व्यक्त केले. दरम्यान संगीता ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता विद्यमान आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश गालफाडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.