केज दि.५ – विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणात आता 25 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. मात्र यामध्ये प्रमुख लढत ही विद्यमान आमदार नमिता मुंदडा. माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि मनसेचे रमेश गालफाडे यांच्यात होण्याचे स्पष्ट चित्र आहे. मात्र यामध्ये सध्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी प्रचारासाठी आखलेली रणनीती कामी येत त्यांच्या प्रचारामध्ये त्रिवेणी संगम दिसून येत आहे.
विद्यमान आमदार नमिता मंडळ यांच्याकडे मतदार संघातील गावागावात कार्यकर्त्यांची तगडी फौज आहे. मागच्या कार्यकाळामध्ये आणि स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या मंत्रिपदाच्या काळात जी काही विकासाची कामे झाली आहेत त्या कामांचा फायदा नमिता मुंदडा यांना प्रचारामध्ये होत आहे. एवढेच नव्हे तर नमिता मुंदडा यांच्यासाठी त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा आणि पती अक्षय मुंदडा यांचाही तळागाळापर्यंत संपर्क असल्याने नमिता मुंदडा यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवणे फारसे अवघड नाही. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी अगदी स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या कार्यकाळापासून गावागावातील कार्यकर्त्यांची मोट बांधलेली आहे. आणि कार्यक्रम कुठलाही असो मग तो आनंदाचा असो किंवा दुःखाचा त्यामध्ये नंदकिशोर मुंदडा हे हजेरी लावतच असतात. त्यामुळे त्यांचा भावनिक संपर्कही मोठा आहे. तर नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांनाही राजकारणाचे बाळकडू मिळालेले असल्याने आणि ओघवती वक्तृत्व शैली लाभल्याने अतिशय स्पष्ट आणि परखडपणे आपला दृष्टिकोन ते मतदारांपुढे मांडत आहेत. एवढेच नव्हे तर अक्षय मुंदडा मित्र मंडळाच्या माध्यमातून हजारो तरुण त्यांच्या संपर्कात आहेत. अक्षय मुंदडा यांचा मोठा वावर मतदारसंघात आहे तर नमिता मुंदडा स्वतः आमदार आहेत आणि त्यांनी आतापर्यंत मतदार संघामध्ये अनेक गावात वेगवेगळ्या माध्यमातून विकास कामे केलेले असल्याने त्यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे.
दरम्यान त्यांची प्रचार यंत्रणा त्रिवेणी संगमासारखी झाली असून स्वतःसह नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा हे वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या गावात जाऊन मतदान करण्याचे आणि मतदारसंघांमध्ये विकासाचा जो अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन करत आहेत. तर आपला प्रतिस्पर्धी कोण आहे. आणि कोण आपल्या वर टीका करत आहे याचा विचार न करता मुंदडा कुटुंबातील हे तिघेही आपली रणनीती पुढे नेताना दिसून येत आहेत.