केज दि. ६ – महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी अनेक मतदारसंघांमध्ये संपूर्ण तयारीनिशी राज ठाकरे यांनी उमेदवार दिले आहेत. आणि याच परिवर्तनाचा एक भाग म्हणून केज विधानसभा मतदारसंघातून ही रमेश गालफाडे यांना उमेदवारी देऊन मोठी ताकद लावण्याचे काम मनसे कडून होत आहे.
राज ठाकरे यांची महाराष्ट्रात एक आगळीवेगळी ओळख आहे. विकासाची दृष्टी असलेले आणि परखड मते मांडणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले होते आणि त्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामेही केलेली आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांच्या पक्षाला म्हणावे तेवढे यश मिळाले नव्हते. मात्र त्यांच्या विचारांचे लोक वर्षानुवर्षे वाढत चाललेले आहेत. मागच्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रावर जे राज्य करतात ते केवळ आश्वासने आणि भुलथापा देतात, विकासाच्या नावाने बट्ट्याबोळ झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस असुरक्षित झालेला आहे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच या सर्व गोष्टींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज ठाकरे या विधानसभेमध्ये मोठ्या ताकतीने मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये चाचणी केल्यानंतर अनुकूल असणाऱ्या मतदारसंघांमध्ये मनसेने उमेदवार दिलेले आहेत. आणि याच चाचणीमध्ये केज विधानसभा मतदार संघही मनसे साठी अनुकूल वाटल्याने केज ची जागा लढवण्याचा निर्धार त्यांनी केला. केज विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांच्या विचारांचे कित्येक मतदार आहेत. मात्र अद्याप पर्यंत राज ठाकरे यांच्या विचाराला आणि त्यांच्या पक्षाला मतदान करण्याची संधी नव्हती. त्यामुळे यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश गालफाडे यांना मनसे कडून उमेदवारी दिलेली असल्याने मनसेच्या रेल्वे इंजिन ला मतदान करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आणि मनसेचे रेल्वे इंजिन विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगाने धावू लागले आहे.
दरम्यान रमेश गालफाडे यांचीही मतदार संघामध्ये एक विशिष्ट ओळख निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्याच्या माध्यमातून रमेश गालफाडे यांनी मतदारांमध्ये जवळीकता निर्माण केलेली आहे. दूरदृष्टी असलेले आणि सर्वांशी परिचित असलेले रमेश गालफाडे हे सध्या मतदारांच्या पसंतीस उतरत आहेत. एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांचे विचार नक्कीच मला प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील असा विश्वास व्यक्त करत तात्या प्रचाराला लागलेले आहेत.