Site icon सक्रिय न्यूज

केजच्या सा. बां. कार्यालयाचे पालटणार रुपडे….!

केजच्या सा. बां. कार्यालयाचे पालटणार रुपडे….!

Oplus_131072

केज दि.८ – मागच्या काही वर्षांपासून केज शहराचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केज तालुक्याचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न अर्थातच उपजिल्हा रुग्णालयाचा होता. त्या प्रश्नाला त्यांनी न्याय दिला आणि केज तालुक्यासाठी सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आणि त्याच धर्तीवर आता विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी सुद्धा अनेक कार्यालयांच्या इमारतीचा प्रश्न हाती घेतला असून काही इमारती पूर्ण झालेल्या आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत.

                केज तालुक्यात सुमारे दीडशे गावांचा समावेश होतो. खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक शहरांमध्ये विविध कार्यालयीन कामासाठी नियमित येत असतात. यामध्ये सर्वात जास्त कामे असलेले कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग असे आहेत. मात्र मागच्या काही वर्षांपूर्वी ही सर्व कार्यालये जुन्या असलेल्या छोट्याशा इमारती मधून चालत होती. केज तालुक्यासाठी असलेले सरकारी रुग्णालय सुद्धा अतिशय छोट्या इमारतीमध्ये चालत असल्याने रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. आणि परिणामी उपचार करून घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागत असे. मात्र स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी हीच अडचण लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हाती घेतला आणि सुसज्ज इमारत उभी करून उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित केले. केज शहरातील तहसील असेल अथवा पंचायत समिती असेल या कार्यालयाच्या सुद्धा इमारती आता सुसज्ज झालेल्या आहेत. तसेच पोलीस ठाणेही नवीन इमारतीमध्ये प्रशस्त अशा ठिकाणी असल्याने तोही प्रश्न सुटलेला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि विश्रामगृहाची इमारत ही जागा असूनही अतिशय कमी जागेमध्ये कार्यान्वित होती. मात्र या प्रश्नाला नमिता मुंदडा यांनी हाती घेतले आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय तसेच शाखा अभियंत्यांसाठी शासकीय निवासस्थान यासह विश्रामगृहाची इमारत काही दिवसांमध्ये पूर्णत्वास जाणार आहे.
                 दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी 1.67 कोटी तर शाखा अभियंता निवासस्थानासाठी 1.33 कोटी रुपयांचा निधी आमदार नमिता मुंदडा यांनी मंजूर करून घेतला असून दोन्हीही इमारती आता प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे रुपडे पालटणार असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार आहे.
शेअर करा
Exit mobile version