केज दि.१० – मतदारांपुढे हक्काने मत मागायला जाण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आपले भरीव असे काम पाहिजे. आणि मग हक्काने आपल्याला त्यांच्यापुढे जाऊन मतदान करण्याचे आवाहन करता येते. आणि याच कामांच्या आणि विकासाच्या जोरावर विद्यमान आमदार नमिता मुंदडा या गावागावात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. आणि यामध्ये सर्वात भरीव काम त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्याचे जाळे विणण्याचे केले आहे आणि दृढ अशा प्रकारचे नाते जुळवले आहेत.
विद्यमान आमदार नमिता मुंदडा भाजपाच्या उमेदवार म्हणून मागच्याही पंचवार्षिक मध्ये आमदार म्हणून होत्या आणि आताही भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. प्रचार हा शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक जण गावागावात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहे. मात्र अन्य उमेदवार भविष्यामधील आश्वासने देत आहेत तर विद्यमान आमदार मागच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाच्या जोरावर आणि पुढे असलेल्या संकल्पावर आधारित मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. विद्यमान आमदार यांनी पाणी, वीज तसेच विविध प्रकल्प, तीर्थस्थानांचा विकास, प्रशासकीय इमारती या सर्व गोष्टीवर जसे लक्ष दिले आहे त्यापेक्षाही जास्त त्यांनी लक्ष ग्रामीण भागातील रस्त्यांवर दिलेले आहे. आज आंबेजोगाई तालुका असेल, केज असेल किंवा नेकनूर परिसर असेल मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचे जाळे विणले आहे. कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांची रस्त्या अभावी जी फरफट होत होती ती आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. आणि असे मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे जाळे विणून त्यांनी आपली मतदारांची नाळ कायम जोडल्याने निवडणुकीतील मार्ग त्यांचा सुकर झाला आहे. कोट्यावधी रुपये मतदार संघामध्ये खेचून आणत रस्त्यांची बांधणी केली आहे. मजबूत रस्ते झाले आहेत त्यामुळे त्याच मजबुतीने त्या मतदारसंघांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. आणि प्रतिसाद ही अगदी सकारात्मक मिळत आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील रस्ते हे बहुतांशी पूर्णत्वाकडे गेलेले आहेत. मात्र आणखीही काही भागांमध्ये रस्ते बांधणीचे काम करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच राहिलेल्या रस्त्यांना मजबुतीने शहरांपर्यंत जोडण्यासाठी पुढच्या पंचवार्षिक मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नमिता मुंदडा या ग्रामीण भागातील नागरिकांना देत आहेत.