Site icon सक्रिय न्यूज

केजमध्येही होणार “राज गर्जना”…!

केजमध्येही होणार “राज गर्जना”…!

केज दि.११ – केज विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोर लावला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यालाच जोड मिळावी म्हणून पक्षाच्या नेत्यांनाही प्रचारार्थ मतदारसंघांमध्ये आणल्या जात आहे. आणि याचाच एक भाग म्हणून मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही गर्जना केज विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार आहे.

               प्रचाराचा धुराळा उडत आहे. राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील नेते आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदारसंघांमध्ये येऊन उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. कुणाच्या भाषणांचा जोर वाढत आहे तर कुणी टीकास्त्र सोडण्यामध्ये तरबेज आहेत. मात्र परखड आणि स्पष्ट वक्ते म्हणून जे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत असे राज ठाकरेही मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ केज मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. केज शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ठाकरेंची “राजगर्जना” होणार असल्याची माहिती मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांनी दिली आहे.
            दरम्यान निवडणुका जरी असल्या, आणि कुणी कोणत्या पक्षाचे जरी असले तरी परखड आणि स्पष्ट वक्ते म्हणून राज ठाकरे परिचित आहेत म्हणून त्यांना ऐकण्यासाठी पक्षाचेच नव्हे तर विरोधी पक्षांचे समर्थक सुद्धा हजेरी लावणार यात शंका नाही.
शेअर करा
Exit mobile version