Site icon सक्रिय न्यूज

राज ठाकरेंना ऐकणाऱ्यांचा हिरमोड…..?

राज ठाकरेंना ऐकणाऱ्यांचा हिरमोड…..?

केज दि.१४ – केज विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रमेश गालफाडे यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. आणि मनसेचे रेल्वे इंजिन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहे. आणि याच रेल्वे इंजिनला बळकटी देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र सभेसाठी जी वेळ दिलेली होती ती वेळ टळूनही गेलेली आहे आणि राज ठाकरे येणार की नाही  ? याबाबत अद्यापही संभ्रम असल्याने वेट अँड वॉचची भूमिका उमेदवाराने घेतली आहे.

                   केज विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच रमेश गालफाडे यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे. रमेश गालफाडे यांनीही त्यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर गावागावात जाऊन प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे. आणि मनसेच्या उमेदवाराला बळकटी मिळावी यासाठी दिनांक 14 रोजी कळंब रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचे जाहीर झाले. आणि त्यानुसार हेलिपॅड असेल किंवा भव्य स्टेज असेल याची संपूर्ण तयारीही झाली. वेळ साडे अकराची असल्याने लोक जमा होऊ लागले होते. मात्र राज ठाकरे येणार आहेत की नाही ? याबाबत अद्यापही संभ्रम असून हेलिकॉप्टरच्या काही तांत्रिक अडचणीमुळे राज ठाकरे यांना केज ला येण्यासाठी अडचण निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे आज येतील की नाही ? अशी अद्याप तरी अधिकृत माहिती मिळाली नसून सध्या तरी वेट अँड वॉच ची भूमिका उमेदवारासह मतदारांमध्ये आहे.
            दरम्यान राज ठाकरे केजला येणार अशी माहिती दिल्यानंतर त्यांचे भाषण ऐकण्यासाठी कित्येक लोक उत्सुक होते. परंतु अद्याप तरी ते येतील की नाही याबद्दल संभ्रम असल्याने मतदारांचा सध्यातरी हिरमोड झाल्याचे चित्र दिसत आहे. आणि वेगवेगळ्या चर्चांना उधानही आले आहे.
शेअर करा
Exit mobile version