Site icon सक्रिय न्यूज

पत्रकार प्रकाश मुंडे कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर….!

पत्रकार प्रकाश मुंडे कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर….!

Oplus_131072

केज दि.१७ – येथील पत्रकार प्रकाश मुंडे यांच्या राहुल नावाच्या मुलाचा अपघात पुणे येथे झाला होता. आणि उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाल्याने प्रकाश मुंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

             प्रकाश मुंडे यांचा मुलगा राहुल मुंडे (22 ) हा पुणे येथे एका कंपनीमध्ये काम करत होता. मात्र मागच्या पाच दिवसांपूर्वी तो स्कुटी वरून चाललेला असताना एका अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली. आणि यामध्ये राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर तात्काळ पिंपरी चिंचवड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारार्थ दाखल केले आणि त्या दिवसापासून राहुलची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र प्रयत्नांची पराकाष्टा करूनही राहुलने रविवारी अखेरचा श्वास घेतला. या अतिशय दुर्दैवी अशा घटनेने प्रकाश मुंडे यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. प्रकाश मुंडे यांची आर्थिक परिस्थिती अतिशय जेमतेम असली तरी त्या महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते. परंतु सर्वांचे प्रयत्न व्यर्थ गेले आणि राहुलने अखेरचा श्वास घेतला. राहुल याच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेअर करा
Exit mobile version