केज दि.१९ – विधानसभा निवडणुकीचा वाजवी प्रचार थांबला आहे. मागच्या एक महिन्यापासून केज विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी होती. प्रत्येक सर्कलमध्ये आपापल्या उमेदवाराच्या विकास कामांचा लेखाजोखा ज्या त्या उमेदवाराचे समर्थक मोठ्या प्रमाणावर मांडत होते.
केज विधानसभा मतदारसंघातील विडा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनीही मोठ्या प्रमाणावर महायुतीचा प्रचार केलेला आहे. आणि म्हणूनच विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन विजयकांत मुंडे यांनी करत आहेत. विजयकांत मुंडे हे विडा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून त्या भागामध्ये विविध विकास कामे करून सर्कलमधील अनुशेष भरून काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडे यांनी जिल्हा परिषद सर्कलमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. नमिता मुंदडा यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याने केज मतदार संघातील अनेक योजना नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित झालेल्या आहेत.
दरम्यान नमिता मुंदडा यांनी मागच्या पाच वर्षांमध्ये अनेक विकास कामांना चालना दिलेली असली तरी मतदारसंघांमध्ये बऱ्याच अंशी विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. आणि तोच भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांना मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन विजयकांत मुंडे यांनी केले आहे.