माजलगाव दि.१९ – माजलगाव मतदारसंघाचे विधानसभेचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या प्रचारासाठी काल दि. १८ रोजी माजलगाव येथे प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही प्रचार रॅलीने विराट रूप घेतल्याचे पाहावयास मिळाले.
संपूर्ण मतदारसंघातील स्थानिक नेते, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, तरूण मतदार, महीला या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती संभाजी महाराज चौकातून ही अभूतपूर्व निघालेली रॅली नंतर जुना मोंढा येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेला विराट जनसमुदाय जमला असल्याने रमेशराव आडसकर यांची असलेली लोकप्रियता दिसून आली. मतदारसंघात यावेळी गावागावात, शहर, तांडा, वस्ती यंदा हाभाडा म्हणून आडसकर यांना मतदारांचा कौल मिळत असल्याचे चित्र आहे. जुना मोंडा परिसरात आयोजित सभेला मा.आ. राधकृण होके पाटील, मा. मोहन सोळंके, अशोक डक ( मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती), बाबुरावजी पोटभरे (बहुजन विकास मोर्चा संस्थापक अध्यक्ष), जगदीश फरताडे (शेतकरी नेते), अशोक जाधव शिवसेना मा. जिला प्रमुख विजयदादा साळवे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) सह अनेक स्थानिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी यावेळी रमेशराव आडसकर यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालणारा, सु:ख- दुख:त उभा रहाणारा व कायम जनतेशी नाळ जोडून ठेवणारा, तरूणांना योग्य दिशा दाखवणारा व मतदारसंघाच्या उज्जवल भविष्यासाठी रमेशराव आडसकर यांच्या शेगडी या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन उपस्थित नेते यांनी केले आहे. कालची आडसकर यांची प्रचार रॅली व सभा ही अभुतपूर्व होती मतदारसंघातील नागरीकांनी दिलेला प्रतिसाद पाहता रमेशराव आडसकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
स्थानिक राजकीय जानकरांच्या मते रमेशराव आडसकर यांच्या पाठीमागे स्थानिक चळवळीतील नेते, कार्यकर्ते असल्याने व मतदारसंघात त्यांच्या विषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे रमेशराव आडसकर यांना मतदार अपक्ष आमदार म्हणून निवडून देऊन इतिहास घडवणार आहेत असे बोलताना ऐकावयास मिळत आहे.