केज दि.२० – आज विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. मतदान हे लोकशाहीने दिलेला मोठा अधिकार आहे आणि तो पार पाडलाच पाहिजे. त्याच अनुषंगाने राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनी आपल्या कुटुंबीयासह केज येथे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा केला.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे तीन लाख 87 हजार मतदारांची नोंद आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी समाजातील काही प्रमुख घटकांनी मतदारांना प्रोत्साहित केले पाहिजे. शहर असो वा ग्रामीण भाग सर्वच नोंद झालेल्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे त्याचबरोबर केज तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रवीण कुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे, पशुपतिनाथ दांगट यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन खासदार रजनीताई पाटील यांनी केले.