Site icon सक्रिय न्यूज

मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मागणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले मत…..!

मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मागणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले मत…..!
दिल्ली दि.२६ – विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम बाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची विनंती करणारी जनहित याचिका फेटाळली आहे.
          देशातील निवडणुकांमध्ये पेपर बॅलेट मतदान प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने फेटाळली. डॉ. के. ए. पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती. (Supreme Court on EVM)
याचिकाकर्त्याने म्हटले की चंद्राबाबू नायडू आणि वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांसारख्या नेत्यांनीही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) छेडछाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर खंडपीठाने म्हटले की, जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी हरले तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे. जेव्हा ते जिंकले तेव्हा ते काहीही बोलत नाहीत. र्ईव्हीएममध्ये छेडछाड होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट सांगितले.
शेअर करा
Exit mobile version