केज दि.२८ – केजच्या प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी तथा आयएएस अधिकारी अर्पिता ठुबे यांनी तालुक्यातील सारणी (आ) ग्रामपंचायतला भेट देऊन गावात सुरू असलेल्या सार्वजनिक व वैयक्तिक कामांची पाहणी केली.
सारणी ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक कामे प्रगतीपथावर सुरू असून गावात राबवण्यात येणाऱ्या सर्व कामाची पाहणी प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी श्रीमती अर्पिता ठूबे यांनी केली यावेळी सुरू असलेल्या व झालेल्या कामांची त्यांनी पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले व गावात करण्यात आलेले बंधिस्त नाली, वैयक्तिक व सार्वजनिक शोष खड्डे, वृक्षारोपण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी त्यांनी वैयक्तीक घरकुल, विहीर पाहणी केली तसेच त्यांनी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र यांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांचे सोबत विस्तार अधिकारी श्री. रोडेवाड, काशीद, दराडे, खाकरे, हतागळे हे पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी गावातील सुरू असलेल्या कामांची व गावाची सर्व माहिती सरपंच संतोष सोनवणे यांनी दिली यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. करपे पी.बी. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुर्यवंशी व सर्व शिक्षक, आरोग्य विभागाचे राहुल थोरात, कृष्णा सुर्यवंशी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी कर्मचारी, आशा ताई, ग्रामपंचायत चे ग्रामरोजगार सेवक दत्तप्रसाद पुरी, पाणी पुरवठा कर्मचारी अक्षय राऊत, रविराज गोरे, मुख्यमंत्री योजना दुत वैभव सोनवणे, आशिष सोनवणे, जनर्धन सोनवणे यांचे सह गावकरी उपस्थित होते.