Site icon सक्रिय न्यूज

महात्मा ज्योतिबा फूले स्मृती दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न….!

महात्मा ज्योतिबा फूले स्मृती दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न….!
केज दि.1 – स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज व राजर्षी शाहू विद्या मंदिर केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उपक्रमशिल कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
             केज येथील गटसाधन केंद्राच्या सभागृहात दि. ३० नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष राहुल राजेसाहेब देशमुख (अध्यक्ष स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज) तर प्रमुख पाहुणे म्हणून केजचे गटशिक्षणाधिकारी  लक्ष्मण बेडसकर तर जी.बी.गदळे सर (सचिव, स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज), श्रीमती बी.बी. चाटे (मुख्याध्यापिका राजर्षी शाहू विद्या मंदिर केज) यांची उपस्थिती होती.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव  जी.बी.गदळे यांनी केले.तर प्रा.डॉ.नवनाथ गंगाधर काशिद बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज, हरिदास अर्जुन शिंदे सरस्वती महाविद्यालय केज,  सय्यद जफर सय्यद जाकेर, जि.प.प्रा.शा.अल्लाउद्दीन नगर केज, अनंत निवृत्तीराव गवळी, कानेश्वर विद्यालय कानडी माळी, शिवकुमार सोमनाथ कोरसळे, जि.प.कें.प्रा.शा.लहुरी यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
       यावेळी श्री. बेडसकर यांनी शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीचे वास्तव विद्यार्थ्यापुढे मांडले.आपल्या परिसरात सामाजिक उपक्रमांची कमतरता आहे अशा परिस्थितीत स्वामी दयानंद प्रतिष्ठान कडून राबविण्यात येणारे उपक्रम हे शिक्षकांना बळ देण्याचं काम करतात असे प्रतिपादन त्यांनी केले. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं महत्वाच काम आपल्या माध्यमातून होत आहे अशा उपक्रमात माझी तुम्हाला नेहमीच साथ असेल असेही ते म्हणाले. तर संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख म्हणाले, आजच्या सर्व आदर्श शिक्षकांनी पुढील आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अजूनही अथक परिश्रम घेऊन कार्य केले पाहिजे.पुरस्कार प्राप्त सगर्वांचे अभिनंदन करत त्यांनी उपस्थिती बद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले.
             कार्यक्रमाचे सुञसंचलन  हनुमंत घाडगे यांनी केले तर आभार शाळेचे ज्येष्ठ शिक्षक  विष्णू यादव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी  देशमुख ए.डी. देशमुख, श्री.क्षीरसागर, डिरंगे, मस्के, श्रीमती जाधव, गायकवाड यांनी सहकार्य केले.यावेळी विद्यार्थी,पालक व हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version