बीड दि.३ – फेंगल चक्रीवादळाने भारतातील दक्षिणेतील राज्यांना तडाखा बसणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाला आहे. मात्र आता ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट मिळाला आहे.त्यामुळे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
नांदेडसह काही जिल्ह्यात आणि कोकणात हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी नुकसान होण्यापासून काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.