Site icon सक्रिय न्यूज

केज येथील सेवानिवृत्त चालकाचे अपघाती निधन….!

केज येथील सेवानिवृत्त चालकाचे अपघाती निधन….!

केज दि.५ – केज मांजरसुंबा रोडवरील नेकनुर येथे झालेल्या अपघातात (दि.५) केज येथील रहिवासी कमाल पाशा गुलाब शेख (६०) हे सेवानिवृत्त चालक जागीच ठार तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.

               सेवा निवृत्त चालक कमाल पाशा गुलाब शेख (रा.बीड रोड, केज) व अन्य दोघेजण सायंकाळी  नेकनूर पासून थोड्याच अंतरावर असताना अपघात झाला. यामध्ये बाबू गुलाब शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर बंडू बाबुराव औटी व बब्रू ग्यानू घाडगे हे दोघेजण जखमी झाले असून बब्रू घाडगे हे गंभीर जखमी असल्याचे समजते. सदरील अपघात नेमका कसा झाला ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बाबू शेख हे ठार झाले आहेत.
शेअर करा
Exit mobile version