Site icon सक्रिय न्यूज

धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजपाचे राज्यभर आंदोलन

बीड दि.२९ – राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केलंय. यावेळी ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान केज मध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी वकील वाडी येथील हनुमान मंदिरासमोर आंदोलन करत मंदिरे उघडण्याची मागणी केली.

लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र, भाजपने मंदिरं सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे. पुणे भाजपकडून सारसबाग गेटवर तसेच पुण्यातील अनेक मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

केज तालुका भारतीय जनता पार्टिच्या वतीने केज शहरात हनुमान मंदीर समोर राज्यातील करोडो लोकांची श्रद्धांस्थान आसलेली देवस्थान मंदीर, धार्मिकस्थळे बंद आहेत ती खुली करावीत या प्रमुख मागणीसाठी तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या नेञत्वाखाली ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले. यावेळी संभळ,घंटा वाजवून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषनाबाजी करून दारूची दुकाने चालु माञ मंदीरे बंद या घटनेचा निषेध करत सरकार च्या विरोधात तिव्र भावना भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी रमाकांत मुडे, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, सभापती पती तथा सरपंच विष्णू घुले, सुरेंद्र तपसे, दत्ता धस, सुनील घोळवे, महादेव सुर्यवंशी, संभाजी गायकवाड, शेषेराव कसबे, आतुल इंगळे, राहुल गळदे,धनंजय घोळवे, योगेश शिंदे ,संतोष देशमुख,बंडु गदळे ,दिनकर चाटे,विक्रम डोईफोडे,बंडु शिंदे,दत्ता इंगळे,सोनु सावंत,अर्जुन बनसोडे,अगंद मुळे,साहेबराव नवगिरे, रमेश बिक्कड, चंदु मिसाळ,बाळासाहेब चंदनशिव,पाडुरंग भांगे,सचिन लोंढे,धनराज लाटे,नवनात सावंत ,दादासाहेब कराड,आशोक राख यांच्यासह आनेकजन उपस्थित होते यावेळी तहसील कार्यालयाकडुन मंडळ अधिकारी व पेशकार यानी निवेदन स्विकारले.

शेअर करा
Exit mobile version