केज दि.१२ – पंचायत समितीला लाभलेल्या अधिकारी तथा गटविकास अधिकारी (आयएएस) अर्पिता ठुबे यांनी रुजू झाल्यापासूनच केज तालुक्यामध्ये कामाचा धडाका सुरू केला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील अनेक गावांना त्या भेटी देत असून त्या त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेत आहेत.
केज पंचायत समितीला मागच्या महिन्यामध्ये अर्पिता ठुबे गटविकास अधिकारी (आयएएस) म्हणून देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या यूपीएससीमध्ये दोन वेळेस उत्तीर्ण झालेल्या अर्पिता ठुबे ह्या केजला गट विकास अधिकारी म्हणून लाभलेल्या आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या अर्पिता ठुबे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. या दरम्यान सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाची आणि माहिती घेतली आणि मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांशी संवाद ही साधला.