Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू…..!

बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू…..!
बीड दि.१२ – येत्या दोन दिवसांत सुरू होत असलेले हिवाळी अधिवेशन तसेच दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
                          मराठा, ओबीसी, धनगर समाजाचे आरक्षण मागणी अनुषगांने आंदोलने चालू आहेत. दि. 16 डिसेंबर 2024 पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.तसेच आगामी कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने होण्याची शक्यता असून अचानक घडणारे घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरक्षणच्या मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहे. या करिता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
                दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजीचे 00.01 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत बीड जिल्हयात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता कलम 37 (1) (3 ) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.
शेअर करा
Exit mobile version