Site icon सक्रिय न्यूज

‘या’ तारखेपर्यंत थंडीची लाट कायम राहणार……!

‘या’ तारखेपर्यंत थंडीची लाट कायम राहणार……!
बीड दि.१७ – राज्यात थंडीची लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
        येत्या 24 तासांमध्ये राज्यात 3 ते 5 अंशांनी तापमान घटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय अरबी समुद्राला जोडून असणाऱ्या भागात चक्राकार वारे असल्याने दक्षिणेत अजूनही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने उत्तर व मध्य भारतात गारठा वाढणार असून थंडीची लाट पसरणार आहे. अशातच आता येत्या 24 तासांत राज्यातील तापमान घटणार असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 16 ते 22 डिसेंबर या कालावधी दरम्यान थंडीची लाट राहणार आहे.
              नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
शेअर करा
Exit mobile version