Site icon सक्रिय न्यूज

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट…..!

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट…..!
बीड दि.४ –  संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोघे सीआयडीच्या हाती लागले असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे या दोघांनाही सीआयडीने (CID) ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
                संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभरातून सर्व आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. यातील चार आरोपी अटक झाले होते, तर प्रमुख आरोपी सुदर्शन घुले सह तिघे आतापर्यंत फरार होते. काल रात्री उशिरा सीआयडीच्या पथकाने यातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्याजवळ ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. एलसीबीचे महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
शेअर करा
Exit mobile version