Site icon सक्रिय न्यूज

अकरा वर्षीय मुलीची केज पोलिसांनी केली सुटका….!

अकरा वर्षीय मुलीची केज पोलिसांनी केली सुटका….!

Kidnapped typographic stamp. Typographic sign, badge or logo

केज दि.८ –  तालुक्यातून अपहरण करण्यात आलेली ११ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली असून अपहरण करणाऱ्यालाही लातूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
        अधिक माहिती अशी की, आई-वडील ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले असताना अल्पवयीन मुलगी, तिची बहीण व भाऊ हे आज्जी सोबत तालुक्यातील एका गावात आजोळी राहत होते. तर ११ वर्षीय वयाची मुलगी ही केज येथील एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकत आहे. दि. ६ जानेवारी रोजी सद्ल्परील वयीन मुलगी ही शौचास गेली असता तिला राजेश उत्तरेश्वर बारगजे (रा.टाकळी ता.केज ) याने मोटारसायकल वरून तिचे अपहरण केले होते. अपहृत अल्पवयीन मुलीच्या आईने केज पोलिसात ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून त्याच्या विरुद्ध गु र नं. १०/२०२५  भा. न्या. सं. १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून दि. ८ जानेवारी रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे आणि त्यांच्या पथकाने लातूर येथून अपहृत मुलीची सुटका केली असून तिचे अपहरण करणारा राजेश उत्तरेश्वर बारगजे याला ताब्यात घेतले आहे.
           दरम्यान, पोलीसांनी पाठलाग करताच मुलीला घेवून अपहरणकर्ता पळून जाऊ लागला. मात्र पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड, पोलीस जमादार राजू वंजारे, पोलीस नाईक शमीम पाशा यांनी आरोपींचा पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले.
शेअर करा
Exit mobile version