मुंबई दि.११ – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारून पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महापालिकेच्या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे.
संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. भाजपने ये तो होना ही था, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. तर महापालिका निवडणुकीत जिथं शक्य आहे, तिथं बसून तोडगा काढू, असं काँग्रेसने म्हटलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीतील फुटीवर भाष्य केलं आहे. ये तो होनाही था असं म्हणत आघाडीला डिवचले आहे.