केज दि.११ – मागच्या कांही दिवसांपासून केज पोलीस अलर्ट मोडवर आले असून अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर केज शहरात दोन ठिकाणी छामेमारी करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
केज ते कळंब जाणारे राष्ट्रीय महामार्गालगत शेतामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा दोन इसमांनी विक्री करिता बाळगून ठेवलेला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनी वैभव पाटील सोबत सपोनी बनसोडे व पोह चौधरी, पोना सोपणे, पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी आज दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता सदर ठिकाणी छापा मारला असता केज कळंब रोड वरील एचपी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दळवी यांचे शेतात व अहिल्यादेवी नगर केज येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा ताब्यात बाळगलेले दोन इसम प्रतिबंधित केलेला गुटखा राजनिवास, विमल इत्यादी असा ३२१०० रुपयाचे मुद्देमालासह मिळून आल्याने पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून शाकिर इक्बाल कुरेशी व राहुल दादासाहेब लांडगे या दोघांना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोह चौधरी हे करत आहेत.
सदरील कारवाई नवनीत कांवत, पोलीस अधीक्षक बीड, चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, कमलेश मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज यांचे मार्गदर्शनाखाली केज पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे.