Site icon सक्रिय न्यूज

वाल्मिक कराडच्या नावे दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द….!

वाल्मिक कराडच्या नावे दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द….!

केज दि.१५ –  नगरपंचायत कडून वाल्मीक कराड यांच्या नावे म वाईन शॉपसाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती हरून इनामदार यांनी दिली आहे.            केज शहरांमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी वाल्मीक कराड यांच्या नावाने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र सदरील ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कुठल्याही वर्तमानपत्रांमध्ये त्याची प्रसिद्धी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नगरपंचायतने घेतलेल्या ठरावाचे विरुद्ध हे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते, असे सांगून सदरील ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे नगराध्यक्ष सीता बनसोड आणि गटनेते हरून इनामदार यांनी सांगितले.

             दरम्यान शहरातील काही बार मालकांनी नगरपंचायत मध्ये जाऊन नगराध्यक्ष सीता बनसोड आणि हरून इनामदार यांची भेट घेतली. त्यादरम्यान नगरपंचायत कडून ही माहिती देण्यात आली.तर वाईन शॉपसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये रितसर प्रसिद्धी देण्यात येते आणि त्या प्रसिद्धीवर पंधरा दिवसाच्या आत कुणाचा आक्षेप जर नाही आला तरच ना हरकत प्रमाणपत्र दिल्या जाते असेही यावेळी सांगण्यात आले.
शेअर करा
Exit mobile version