Site icon सक्रिय न्यूज

मुद्देमालासह महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात….!

मुद्देमालासह महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात….!
बीड दि. १७ – बस स्थानकामध्ये बसधुन प्रवाशांचे दागिने चोरी करणारी महिला स्था.गु.शा.बीड ने  जेरबंद केली असून 10 तोळयाचा सोन्याचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.
               अधिक माहिती अशी की, श्रीमती पल्लवी काकडे, व्यवसाय नोकरी, रा.साबला ता.केज ह.मु.चंद्रपुर यांनी पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे दिनांक 08/11/2024 रोजी तक्रार दिली होती की,  दिनांक 03/11/2024 रोजी 0900 वा. दरम्यान बीड बस स्थानक येथे संभाजीनगर ते अंबाजोगाई बस मध्य बसल्या असतांना त्यांचे जवळील बॅग मधील सोन्याचे विविध दागिने 16.1 तोळे कि.अं.10,16,000/- रु चे दागिने अज्ञात चोरटयाने चोरुन नेले होते. त्यावरुन पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे गुरनं 568/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.
          पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोउपनि श्रीराम खटावकर व पथकाले दिले होते. त्यावरुन पोउपनि खटावकर यांनी सदर गुन्हयाचा स्था.गु.शा.बीड तपास करीत असतांना दिनांक 09/01/2025 रोजी गोपनिय बातमिदाराकडुन गुप्त बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा शिल्पा गब्या चव्हाण रा.पाथर्डी जि.अहिल्यानगर हिने केला असून ती शिरुर कासार येथे आहे. या खात्रीलायक बातमीवरुन संशयीत महिलेचा अभिलेख तपासणी केला असता सदर महिलेला अशा प्रकारच्या चोऱ्या करण्याची सवय असल्याने सदर महिलेचा शिरुर कासार भागात शोध घेण्यास सुरुवात केली. शिरुर येथुन तिचे बहिणीचे घरुन महिलेस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तिने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर महिलेस पो.स्टे. शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले असुन तिचे ताब्यातुन एकुण 10 तोळयाचे सोन्याचे दागिने कि.अं.5,82,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
              दरम्यान, केज बसस्थानकातून ही मागच्या कांही महिन्यांमध्ये कित्येक महिलांचे दागिने चोरीला गेलेले आहेत. बसस्थानकात सीसीटीव्ही असूनही अद्याप पोलिसांना चोरटे जेरबंद करण्यात यश आलेले नाही. मात्र सदर महिला ताब्यात घेतल्यामुळे केजच्या चोऱ्या ही उघडकीस येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
              सदरची कामगिरी नवनीत काँवत पोलीस अधीक्षक,बीड, सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि  उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे,  ग्रपोउपनि तुळशिराम जगताप, पोह/ मनोज वाघ, कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, अशोक दुबाले, दिलीप खांडेकर, मपोह/सुशिला हजारे, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड,बाळु सानप, पोशि/अलिम शेख , अश्विनकुमार सुरवसे, चापोशि/ सुनिल राठोड, व मांजरे यांनी केली आहे.
शेअर करा
Exit mobile version