Site icon सक्रिय न्यूज

विडा शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा….!

विडा शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा….!
केज दि.१७ – तालुक्यातील विडा येथील शाळेत ३४ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार झाला असून सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्री.गवळी यांनी दिली.
         विडा येथिल रामकृष्ण विद्यालयात दि.१७ रोजी शालेय पोषण आहार म्हणून खिचडी शिजवली होती. सदरील पोषण आहार एकूण १३२ विद्यार्थ्यांनी सेवन केला यामध्ये एकूण ३४ विद्यार्थ्यांना एक तासाने मळमळ, उलट्या, चक्कर येणे, डोकं दुखणे अशा तक्रारी सुरू झाल्या. सदरील प्रकार विद्यार्थ्यांनी शिक्षकाला सांगितल्या नंतर विद्यार्थ्यांना तात्काळ विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ३४ पैकी २७ विद्यार्थ्यांवर  उपचार करून घरी पाठवण्यात आले तर सात विद्यार्थ्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
           दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी तात्काळ विडा येथील आरोग्य केंद्रात भेट देऊन कर्मचाऱ्यांना सूचना करून योग्य तो उपचार केला. सदर प्रकार पालीच्या लेंड्या, व उंदराच्या लेंड्यामुळे अशी विषबाधा होऊ शकते अशी माहिती डॉ. अशोक गवळी यांनी सांगितले.
शेअर करा
Exit mobile version