बीड दि.३ – सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यनातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करते.शेतकऱ्यांसाठी सरकारनं सुरु केलेल्या अशाच एका योजनेचे नाव आहे किसान क्रेडिट कार्ड योजना.
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून अत्यंत कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या कर्ज योजनेला किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड म्हणतात. या योजनेत शेतकरी 4 टक्के व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.मात्र, यासाठी काही अटी आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ भारतातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या कर्ज योजनेचा उद्देश आहे. यामध्ये शेतकरी चार टक्के व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. यापेक्षा जास्त कर्ज शेतकऱ्यांनी घेतल्यास व्याजदर वाढतो.