Site icon सक्रिय न्यूज

ट्रेनी शिक्षकांबद्दल दुजाभाव, कधी लागणार प्रश्न मार्गी….!

ट्रेनी शिक्षकांबद्दल दुजाभाव, कधी लागणार प्रश्न मार्गी….!
केज दि.5 – मागच्या कांही दिवसांपूर्वी जि. परिषद तसेच खाजगी शिक्षण संस्थेत ट्रेनी शिक्षक नेमण्याचे आदेश झाले. त्या अनुषंगाने भरतीही झाली. मात्र खाजगी शाळेतील शिक्षकांमध्ये आणि जि. प.शिक्षकांबद्दल दुजाभाव होत असल्याचे दिसत आहे.
      कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय क्र संकीर्ण 2024/प.क्र 90/व्यशी-3,दि.9 जुलै 2024 नुसार शिकाऊ प्रशिक्षणार्थी योजने अंतर्गत जि.प.शाळा व त्याचबरोबर खाजगी संस्थेत ट्रेनी शिक्षक रूजू करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु यामध्ये जि.प.शाळावरील ट्रेनी शिक्षकांची माहिती ऑनलाईन करुन त्यांचे वेतन देखील आले. परंतु खाजगी शाळेतील ट्रेनी शिक्षकांचे वेतन तर सोडा अद्याप त्यांंची माहिती ऑनलाईन झाली नसून ट्रेनी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारपुस केली असता कोणत्याही प्रकारची माहिती आम्हाला आली नाही, खाजगी शाळेतील ट्रेनी शिक्षकांना रूजू करण्याचे आदेश दिले नाहीत अश्या प्रकारचे उत्तरे मिळत आहेत. वास्तविक पाहता केज तालुक्यातील सर्व संस्थेवरील शाळेतील ट्रेनी शिक्षक हे रुजू झाल्यापासून ते आत्तापर्यंत शाळेत स्व खर्चाने हजेरी लावतात. परंतु अद्यापही त्यांंचे मानधन आले नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे.
          दरम्यान, यामध्ये आम्ही आत्तापर्यंत काम केले त्याचा मोबदला मिळणार का? मिळणार तर कधी? असे प्रश्न ट्रेनी शिक्षकांसमोर उभे राहिलेले आहेत.त्यामुळे सदरील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
शेअर करा
Exit mobile version