Site icon सक्रिय न्यूज

मांजरसुंभाजवळ अपघात; दोघा डॉक्टर्सचा मृत्यू…!

मांजरसुंभाजवळ अपघात; दोघा डॉक्टर्सचा मृत्यू…!

Oplus_131072

बीड दि.८ – जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी केजजवळ दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा जवळील मुळूकवाडी येथे देव दर्शन करून परत येत असताना दोन वाहनाची धडक झाली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत.
            दिनाक 7 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान मुळुकवाडी येथे भिषण अपघात झाला या अपघातात डॉ.मृणाली भास्कर शिंदे व डॉक्टर असलेलाच मृणालीचा चुलत भाऊ जागीच ठार आणि डॉ.मंथन चव्हाण व त्यांची पत्नी हे दोघे नवविवाहित दाम्पत्य गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. जेजुरी वरून देवदर्शन करून पालम जि. परभणी येथे परत जात असताना मुळुकवाडी येथील पुलावर हा अपघात झाला. सदरील अपघात एवढा भयानक झाला की गाडीचे टायर सुद्धा निखळून पडले आहेत. अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र यामध्ये दोन तरुण डॉक्टर्स मृत्युमुखी पडले तर अन्य एक डॉक्टर व त्यांची पत्नी मृत्यूशी झुंज देत आहेत. तर डॉ. मृणाली ह्यांची एक वर्षाची मुलगी सुखरूप असल्याचे समजते.
            दरम्यान, पालम येथील ममता कॉलेज मधून नुकतेच ज्यु. प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले एम.पी.चव्हाण ह्यांच्या मंथन नावाच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते म्हणून सर्व भावंडं आणि इतर नातेवाईक देवदर्शनाला गेले होते. मात्र देवदर्शन करून परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने चव्हाण, शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
शेअर करा
Exit mobile version