Site icon सक्रिय न्यूज

बीड पोलिसांनी सुरू केलेल्या संवाद प्रकल्पाला मोठा प्रतिसाद…..!

बीड पोलिसांनी सुरू केलेल्या संवाद प्रकल्पाला मोठा प्रतिसाद…..!
बीड दि.१३ –  पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सुरु केलेले संवाद ऍप गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक या ऍपच्या माध्यमातून पोलिसांशी जोडल्या जात आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून संवाद ऍप वरून मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन बीड पोलीसांनी गुटख्यावर कारवाई केली आहे.
           पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जनतेच्या तक्रारी जाणुन घेण्यासाठी सुरु केलेल्या संवाद प्रकल्प अंतर्गत जनतेस देण्यात आलेल्या क्युआर कोडवर दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पो.स्टे. परळी ग्रामिण हद्यीत मौजे धर्मापुरी येथील सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा / तंबाखुजन्य पदार्थ असल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने सदरची माहीती मा. पोलीस अधीक्षक यांनी पो.स्टे. परळी ग्रामिण प्रभारी अधिकारी यांना देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहीतीवरुन प्रभारी अधिकारी पो.स्टे. परळी ग्रामिण यांनी दोन स्वतंत्र पथके तयार करुन मौजे धर्मापुरी येथील सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांचे किराणा दुकानावर व राहते घरी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी मिळुन शॉट पानमसाला, नवरतन पान मसाला, विमल पान मसाला, V-1 तंबाखु, जाफरानी तंबाखु व इतर तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण 13,50,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळुन आल्याने सदरचा मुद्येमाल पो.स्टे. परळी ग्रामिण येथे आणुन पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याकामी अन्न व औषधी प्रशासनास पत्र व्यवहार करण्यात आला असुन अन्न व औषधी प्रशासनाच्या तपासणी नंतर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
             सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि  मजहर सय्यद, सपोनि समाधान कवडे, पोउपनि अंकुश निमुने, रियाज शेख, पोअं. विष्णु घुगे, पांडुरंग वाले, सुनिल अन्नमवार, तुळशीराम परतवाड, सुंदर केंद्रे, शंकर वाघमारे सर्व नेमणुक पो.स्टे. परळी ग्रामिण यांनी केली आहे.
               सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक यांनी सुरु केलेल्या संवाद प्रकल्प ऍपवर मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन करण्यात आलेली आहे. बीड पोलीस दलातर्फे बीड जिल्हयातील जनतेस अवाहन करण्यात येते की, संवाद प्रकल्प ऍप वर जास्तीत जास्त गोपनिय माहीती दयावी जेणे करुन अवैध धंदयावर धडाकेबाज कारवाई करता येईल असे आवाहन करण्यात आले असून माहीती देणाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version