बीड दि.१४ – जिल्ह्यातील नागरिक आणि पोलिसांचा संवाद वाढवा. सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांची भीती नाही तर दिलासा मिळाला या हेतूने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत नवनवीन उपक्रम राबवत आहेत. मागच्या कांही दिवसांपूर्वी सुरू केलेला संवाद प्रकल्प याचाच एक भाग असून प्रतिसादही चांगला मिळत आहे. आणि आता यापुढे जाऊन नवनीत कॉवत यांनी पोलिसांशी संपर्क करणे सोपे केले असून जिल्ह्यातील ठाणे प्रमुख आणि अन्य कांही पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर जनतेसाठी जाहीर केले असून अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही पोलिसांशी थेट संपर्क करता येणार आहे.
आता पोलिसांशी संपर्क करणे झाले सोपे…..!

Oplus_131072