Site icon सक्रिय न्यूज

कळंब येथील भक्तांना मिळाले प्रयागराज चे दर्शन…..!

कळंब येथील भक्तांना मिळाले प्रयागराज चे दर्शन…..!
कळंब दि.२२ – सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याची पर्वणी सुरू आहे. करोडो भाविक कुंभमेळ्यात जाऊन गंगेत स्नान करून पुण्यकर्म कमवत आहेत. तर काहीजण इतरांना दर्शन घडवून समाधान मिळवत आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून कळंब शहरातील रमेश पवार, अभिजित पवार आणि गणेश पवार ह्या तिघांनी शहर व परिसरातील राम भक्ताना प्रयागराज येथील शाही स्नान व आजुबाजूच्या गावातील देव दर्शन उत्तम रीत्या घडवून आणले आहे.
                   कळंब शहरातून १४ फेब्रुवारीला प्रयागराज कडे प्रस्थान झाले होते. या मध्ये औंढा नागनाथ, रामटेक, प्रयागराज, अयोध्या, तीर्थक्षेत्र काशी, शिहोर, उज्जैन, ओंकारेश्वर अशी महत्त्वाची देवस्थाने भक्ताना दर्शनासाठी अवघ्या नाममात्र शुल्कात घेऊन गेले होते. या यात्रेमध्ये अगदी ऐंशी वर्षाचे वृद्ध यांचाही समावेश होता. पवार यांनी प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची काळजी घेऊन सर्वांना सांभाळून कळंब कडे शनिवारी मार्गस्थ केले. या यात्रेमध्ये एकूण चार ट्रॅव्हल्स बुक केल्या होत्या  प्रत्येक गाडी मध्ये किमान चाळीस भाविक भक्त होते. एक गाडी बीड येथून तर अन्य तीन गाड्या ह्या कळंब मधून ठरवण्यात आल्या होत्या. कळंब च्या तीन बसेस मध्ये खामसवाडी, येवती, वाशी, कळंब, पानगाव, येरमाळा शिवाय कळंब शहरातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला होता. या दहा दिवसाच्या तीर्थ यात्रेमध्ये भक्ताना दोन वेळा चहा, एक वेळ नाश्ता तर एक वेळ चे पौष्टिक जेवण देण्यात येत होते.  त्यामुळे साहजिकच भक्ताना दर्शनासाठी एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत होती. सर्व भाविक भक्तांनी पवार बंधूंचे शेवटी आभार मानले.शिवाय सहारा ट्रॅव्हल्स यांनी पण सुरक्षित असा प्रवास घडवून आनल्याबद्दल त्यांचे ही आभार मानले.

              पवार कुटुंबीय दरवर्षी किमान दोन ते तीन तीर्थयात्रा अगदी नाममात्र शुल्कामध्ये घडवून आणतात. गर्दीच्या ठिकाणी सर्वांची योग्य ती काळजी घेतात. शिवाय वयस्कर लोक तर अक्षरशः आपले घरदार विसरून जातात.आणि देवदर्शनाचा लाभ घेतात.

शेअर करा
Exit mobile version