Site icon सक्रिय न्यूज

साबला येथे स्वच्छता अभियान…..!

साबला येथे स्वच्छता अभियान…..!

Oplus_16908288

केज दि.२५ – तालुक्यातील साबला येथे ” उत्तरेश्वर महाराज ” यांचे जागृत देवस्थान असल्यामुळे  येथील तरुण मित्रमंडळींनी महाशिवरात्री निमित्त स्वच्छता अभियान राबवलं. हनुमान मंदिर ते उत्तरेश्वर महाराज देवस्थान पर्यंतचा रस्ता व मंदिर परिसरातील पूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
             गेल्या अनेक वर्षांपासून साबला येथील तरूण मित्रमंडळी गावात नेहमी कोणत्या नं कोणत्या कारणाने गावात स्वच्छता अभियान राबवत आहे. “माझा गाव, स्वच्छ गाव ” माझा गाव , सुंदर गाव ” या प्रमाणे गावातील तरुण मित्रमंडळी या अभियानात सहभागी होतात.
             यामध्ये आदर्श शिक्षक नरहरी काकडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, पोपट काकडे, माजी उपसरपंच काशिनाथ नाईकनवरे, इंजिनियर महेशराव काकडे , राहुल मुळे, गणेश कटारे, लखन राऊत, राजेभाऊ काकडे, वसंत नाईकनवरे, संदिपान काकडे, अनंत नाईकनवरे, अनिल भोसले, सदाशिव काकडे, जालींदर मुळे इत्यादी तरूण मित्रमंडळींनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
शेअर करा
Exit mobile version