अंबाजोगाई दि.२ – माध्यम क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविलेल्या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक मीडियात स्वतःची वेगळी ओळख बनवलेल्या दैनिक वार्ता समूहाचा 17 वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि.15 मार्च 2025 रोजी सायं.5.00 वा.अंबाजोगाई येथे श्री मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी संपन्न होणार असून पुरस्कार वितरण सोहळाही पार पडणार आहे.
यावेळी अल्युमिनियम क्षेत्रात ज्यांची जगभर कीर्ती आहे असे ‘ॲल्युमिनियम मॅन’ म्हणून ओळख निर्माण केलेले जर्मनी येथील उद्योजक व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र इंजि.भरत केशवराव गित्ते यांचा जाहीर सत्कार यानिमित्ताने आयोजित केला आहे. तर वार्ता समूहाच्या पुरस्काराचे वितरण त्यांच्याच हस्ते होणार आहे. दैनिक वार्ता समूहाचे यंदाचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहेत.ज्यामध्ये नगरभूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रख्यात उद्योजक लक्ष्मणराव मोरे यांना सद्भावना पुरस्कार हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र व सेलू जि.परभणी येथील दुय्यम निबंधक वर्ग 2 सतीश बनसोडे यांना तर युवा गौरव पुरस्कार हा अंबाजोगाईतील युवा उद्योजक सुजित दिख्खत (ठाकूर) यांना जाहीर झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती दैनिक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी दिली आहे.
दैनिक वार्ता समूह हा गेल्या 17 वर्षापासून माध्यम क्षेत्रात भरीव असे कार्य करत आहे.गेल्या 17 वर्षात सामाजिक दृष्ट्या आपली जबाबदारी ओळखून आपले कर्तव्य अदा केले आहे. माध्यम क्षेत्रात काम करत असताना मुद्रित माध्यम असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यात वार्ता समूहाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने भूमिपुत्रांचा गौरव आणि सन्मान केला जातो अंबाजोगाईचे भूमिपुत्र जे राज्यभर असो की देशभर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहेत अशांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा २०२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये नगरभूषण पुरस्कार हा मोरेवाडीचे भूमिपुत्र लक्ष्मणराव मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे. लक्ष्मणराव मोरे हे साखर उद्योगातील विश्वसनीय नाव आहे. केज येथील गंगा माऊली साखर कारखाना ते स्वतः चालवत आहेत. उद्योजक म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. तसेच सतीश बनसोडे यांना सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सतीश बनसोडे हे अंबाजोगाईचे भूमिपुत्र असून ते सेलू जि.परभणी येथे दुय्यम निबंधक वर्ग 2 या पदावर कार्यरत आहेत. अंबाजोगाई व परिसरात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. विविध चळवळीशी ते एकरूप झालेले आहेत तर युवा गौरव पुरस्कार हा अंबाजोगाई येथील युवा उद्योजक व हॉटेल साई पॅलेस चे मालक सुजितसिंह उदयसिंह दिख्खत (ठाकूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. सुजित दिख्खत (ठाकूर) हे हॉटेल व्यवसाय आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायातील यशस्वी उद्योजक आहेत. त्यासोबतच सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव असे कार्य आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 15 मार्च रोजी सायं. 5.30 , वा.अंबाजोगाई येथील श्री मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद अंबाजोगाई या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमात जगविख्यात उद्योजक व ‘ॲल्युमिनियम मॅन’ म्हणून ओळख असलेले व टोरल इंडिया कंपनीचे मुख्य प्रवर्तक इंजि. भरत केशवराव गित्ते यांच्या यांच्या हस्ते मान्यवरांचा जाहीर सत्कार होणार आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, परभणी येथील जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, केजच्या नगराध्यक्ष.सौ सीताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे संस्थापक हरूनभाई इनामदार,अभियांत्रिकी महाविद्यालय अंबाजोगाईचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, अंबाजोगाई येथील उद्योजक प्रतापराव पवार, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे, पुणे येथील प्रसिद्ध डॉ. सचिन नागापूरकर, परळी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ फड, प्रा.ईश्वर मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. याच कार्यक्रमात एमपीएसडी परीक्षेत उत्तीर्ण झालेले इंजी.श्रीनाथ गीते व इंजी .सुमित राजाभाऊ लोमटे यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते ,अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ तालुका अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अंबाजोगाई, अ .भा. म .पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई, गुड मॉर्निंग ग्रुप अंबाजोगाई, अ.भा.म. प. डिजिटल मीडिया शाखा अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.