केज दि.४ – तालुक्यातील मौजे मांगवडगाव येथील रहिवाशी असणारे शामराव थोरात गुरुजी हे समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचे योगदान विशेषतः ग्रामीण शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय राहिले आहे. याच बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी कार्य गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दि.२ मार्च २०२४ रोजी जे.के फक्शन हॉल फुलेनगर केज येथे करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विद्यापीठ अनुदान आयोगचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे तसेच विचारवंत काळोखे हे होते . यावेळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जर्मनी येथे नौकरीस लागलेल्या कु. शिवानी बचुटे हिचा संयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर श्यामराव थोरात गुरुजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाशन टाकनारा कार्य गौरव ग्रंथ ” समतेचा शिलेदार ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. वसंत ओगले यांनी केले .त्यानंतर गुरुजींच्या सोबत सर्व स्तरावर कार्य करणाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करून कालकथित श्यामराव थोरात गुरुजी यांच्या आठवणी जिवंत केल्या मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय समारोपात ” समतेचा शिलेदार ” श्यामराव थोरात गुरुजी अष्टपैलु व्यक्तिमत्व यावर डॉ. सुखदेव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रज्ञा जाधव हिने केले तर आभार ॲड सचिन थोरात यांनी मानले . या कार्यक्रमाचे आयोजन गौरव ग्रंथ समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक मुजमुले, सचिव डॉ .ओमप्रकाश नायर तसेच गौरव ग्रंथाचे मुख्य संपादक प्रा. प्रकाश सिरसाठ यांनी केले होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने जनसुमुदाय उपस्थित होता. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. नगसेवक कपिल मस्के , संपादक अजय भांगे, नयुम शेख, विलास पवळे, निशांत जाधव, रोहित थोरात , राहुल शिंदे आदिनी परिश्रम घेतले.