केज दि.८ – तालुक्यातील आवसगावचे भूमिपुत्र तथा पत्रकार सचिन साखरे यांची दैनिक शिवजगार, विश्वनाथ फाउंडेशन यांनी महाराष्ट्र रत्न गौरव”आदर्श युवा पत्रकार” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
28 फेब्रुवारी रोजी सवित्रीबाई फुले स्मारक, संस्कृतिक भवन गंजपेठ पुणे येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, सिने दिग्दर्शक ओमकार माने, मिसेस ग्लोबल इंडिया स्मिता राठोड, उद्योजिका सुजताताई चिंता यांच्यासह इतर मान्यवरनाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयजोक ऍड. शंकर शेषेराव चव्हाण विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजगार इन्फोडाड यांनी केल आहे हे मागील अनेक वर्षा पासून सामाजिक, राजकीय, कला, संस्कृतिक, क्रीडा, पत्रकारिता, आदर्श ग्रामपंचायत, अशा अनेक क्षेत्रातील चांगले कार्य करणार्यांना पुरस्कार देऊन सन्मान करतात. त्यातील 2025 वर्षीचा महाराष्ट्र रत्न “आदर्श युवा पत्रकार” पुरस्कार पत्रकार सचिन धनराज साखरे यांना मिळाल्या बदल साखरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.