बिडकीन दि.११ – राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आमदार विलास संदीपान भुमरे प्रतिष्ठान व डॉ. शिंदे धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने सलग आठ दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
शिबिराच्या आज पहिल्या दिवशी शिबिराचे उद्घाटन एकनाथ महाराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी बिडकीन चे सरपंच अशोक धर्मे, युवा सेना जिल्हाप्रमुख काकासाहेब पाटील टेके, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे, ग्रा.प. सदस्य मधुकर सोकटकर, किरण गुजर, बबन ठाणगे, डॉ. दिपक गायकवाड, डॉ त्रिंबक पाडळकर, सुभाष जाधव, अंकुश काळे, पत्रकार सुनील बदर, गणेश उघडे, योगेश छबिलवाड, कांताभैय्या डोळस, बद्री गायके व अल्पाईन हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथिल टीम चे डायरेक्टर डॉ.संतोष शेळके, डॉ. असलम शेख व नर्सिंग स्टाफ भाग्यश्री गवंदे, दीपाली निकाळजे व हेमंत जाधव हे कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये एकूण 228 रुग्णांनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासह इतर आजारांची मोफत तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आली. तसेच पोलीस स्टेशन कडुन रेणुका बोंबले, शीतल जाधव, काजल चव्हाण, सुरेखा राठोड उपस्थित होते.