बीड दि.२१ – सिरसमार्ग ता. गेवराई येथे जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी गेली १८ दिवसापासुन सुरू असलेल्या जवळपास १४० गावच्या लोकलढा आंदोलनास आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलनकर्ते दिनेश गुळवे, पप्पु रडे, देविदास चव्हाण यांची आस्थेवाईक पणे चौकशी केली.
खासदार रजनीताई पाटील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना तत्काळ भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधत विषयाचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ कारवाई करण्याची विनंती केली व आंदोलन कर्त्याना उपोषण सोडण्याची विनंती केली. आंदोलनकर्त्यांनीही सहमती दर्शवत राहुल सोनवणे व प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत लिंबू शरबत घेऊन उपोषण मागे घेतले. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील व संबंधित अधिकार्यांशी भेट घालुन देण्याचेही आश्वासन दिले.