Site icon सक्रिय न्यूज

पिकउप – मोटारसायकल अपघातात दोघे ठार…..!

पिकउप – मोटारसायकल अपघातात दोघे ठार…..!
केज दि.२६ – युसुफ वडगाव पोलीस ठसण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाजोगाई – कळंब रोडवरील सावळेश्वर ते औरंगपूर दरम्यान पिकउप आणि मोटारसायकल च्या अपघातात दोघे ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
              सावळेश्वर – औरंगपूर दरम्यान सदरील दि.२६ मार्च रोजी दुपारी सदरील अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच युसुफ वडगाव ठाण्याचे प्रभारी एपीआय मच्छिंद्र शेंडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील मृतांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
           दरम्यान, या अपघातात दुचाकीवरील दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार झाले. सुभाष आश्रुबा मोहिते ५० आणि सुनिल भीमराव पवार ४०, दोघेही रा बार्शी, ह. मु. सातेफळ, वीटभट्टी, अंबाजोगाई अशी मृतांची नावे आहेत.
शेअर करा
Exit mobile version