Site icon सक्रिय न्यूज

”यश” ने मिळवले नवोदय पात्रता परीक्षेत घवघवीत यश….!

”यश” ने मिळवले नवोदय पात्रता परीक्षेत घवघवीत यश….!

Oplus_16908288

केज दि. २ – शहरातील सौ. शांताबाई तापडिया पब्लिक स्कूलचा विद्यार्थी यश सोमनाथ कांबळे यांने नवोदय पात्रता परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत नवोदय साठी पात्र ठरला आहे.
             तालुक्यातील जानेगाव येथील रहिवासी यश कांबळे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा केज शहरातील सौ. शांताबाई तापडिया पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेच्या या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा पात्रता परीक्षेसाठी कठोर परिश्रम घेत अभ्यास पूर्ण केला आणि मागच्या महिन्यामध्ये झालेल्या परीक्षेमध्ये यश संपादन करत त्याने नवोदय साठी पात्रता सिद्ध केली आहे.
           सदरील यशाबद्दल त्याचे संस्थाप्रमुख डॉ. विजय तापडिया, प्रिन्सिपल स्वप्नील कडेकर यांच्यासह शांताबाई तापडिया पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शेअर करा
Exit mobile version