Site icon सक्रिय न्यूज

शाळेची बस झाडावर आदळल्याने विद्यार्थ्यांसह चालक जखमी….!

शाळेची बस झाडावर आदळल्याने विद्यार्थ्यांसह चालक जखमी….!

बीड दि.५ – शाळेला विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बस झाडाला धडकल्याची घटना आष्टी शहराजवळ घडली.येथील अहिल्यानगर बीड रस्त्यावरील बेलगाव चौकात हा अपघात झाला.
वटणवाडी येथून शाळेला विद्यार्थी घेऊन ही स्कूल व्हॅन
आष्टी कडे जात होती. सकाळच्या सत्रातील शाळा असल्याने चालक मुलाला घेऊन चालला होता. अचानक समोर आलेल्या कार ला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक झाडावर जाऊन धडकला. हा अपघात इतका भयानक होता की यामुळे विद्यार्थी घाबरले.तर अचानक झालेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला. यामधे अनेक विद्यार्थी जखमी झालेले असून वाहन चालकाला चांगलाच मार लागलेला आहे.

दरम्यान, जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. नेमका अपघात कसा झाला याबाबत पोलिस तपास करत आहेत.

शेअर करा
Exit mobile version