Site icon सक्रिय न्यूज

”हा” निवृत्त क्रिकेटर पुन्हा दाखवणार आपली जादू……!

दिल्ली – सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तो लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, युवराजने घरगुती क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्स मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या कोव्हिड-१९ मुळे भारतात क्रिकेट ठप्प पडले आहे. परंतु युवराज मागील काही महिन्यांपासून युवा खेळाडू शुबमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग यांच्याबरोबर मोहाली येथील पीसीए स्टेडिअममध्ये सराव करत होता.
सराव सत्रात असे दिसते की, युवराजने क्रिकेटबद्दलची त्याची आवड पुन्हा शोधून काढली आहे आणि आता टी२० स्पर्धेत पंजाबकडून त्यांच्या युवा खेळाडूंच्या विकासासाठी खेळण्याची इच्छा आहे.
“सुरुवातीला मला खात्री नव्हती की मला ही ऑफर घ्यायची आहे,” असे क्रिकबझशी बोलताना युवराज म्हणाला.
मी घरगुती क्रिकेट खेळलो होतो. तरीही बीसीसीआयकडून परवानगी मिळाली तर मला जगभरातील इतर फ्रँचायझी आधारित लीगमध्ये खेळणे सुरू ठेवायचे आहे. परंतु बाली यांच्या विनंतीकडे मी दुर्लक्ष करू शकलो नाही. मी जवळजवळ तीन किंवा चार आठवड्यांपर्यंत  यावर बराच विचार केला आणि शेवटी असे झाले की मला एक जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा लागला नाही,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
“मला परवानगी मिळाल्यास मी फक्त टी२० क्रिकेट खेळेल. परंतु कोणाला माहित आहे. पाहुया,” असे टी२० क्रिकेटबद्दल बोलताना युवराज म्हणाला.
ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी युवराज क्लबची मागणी करत असल्याचे वृत्त आहे. पण आता त्याने याची खात्री केली आहे की, जर तो पंजाबकडून खेळत असेल, तर तो विदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी मिळवणार नाही.
त्याने बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना पंजाबकडून खेळण्यासाठी आणि सेवानिवृत्तीतून बाहेर येण्याची परवानगी मागण्यासाठी पत्र लिहिले आहे.
शेअर करा
Exit mobile version