Site icon सक्रिय न्यूज

आवादा कंपनीची मनमानी : शेतकरी आक्रमक….!

आवादा कंपनीची मनमानी : शेतकरी आक्रमक….!
केज दि.१२ – शेतकऱ्यांचा विरोध असतानाही आवादा कंपनीचे लोक जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश करून त्या ठिकाणी उच्च दाबाच्या वाहिनीचे टॉवर उभारण्यासाठी बळजबरीने शेत बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार सुमारे 40 शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
          केज शिवारातील 167,174, 176, 185, 190 या सर्वे नंबर मधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आवादा कंपनीचे काही लोक विनापरवानगी प्रवेश करत आहेत  आणि त्या ठिकाणी उच्च वाहिनीचे टॉवर बसवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र सदरील उच्च दाबाच्या वाहिनी साठी सॅटेलाईट द्वारे या अगोदरच सर्वे करण्यात आलेला आहे. मात्र पुन्हा हे आवादा कंपनीचे लोक जबरदस्तीने शेतात घुसून जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
          दरम्यान, पूर्वी सॅटॅलाइटच्या माध्यमातून झालेल्या सर्वेनुसार उच्च दाबाची वाहिनी बसवण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सदरील आवादा कंपनीचे लोक जे गैरमार्गाने जमिनीचा जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर प्रतिबंध लावावा अशा मागणीचे निवेदन केजच्या तहसीलदारांना देण्यात आलेले आहे. सदरील निवेदनावर सुमारे 40 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदरील सर्वे न थांबवल्यास आंदोलनाचाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शेअर करा
Exit mobile version